काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. सध्या मिलिंदचा एका वेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो पाहून मिलिंदने असा लूक का केला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मिलिंद सोमण लवकरच ‘पौरषपुर’ या वेब शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो एक वेगळी भूमिका साकारणार आहे. या वेब शोमधील मिलिंदचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आल्टबालाजीने मिलिंदचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद शर्टलेस दिसत असून त्याने नाकात नोज रिंग, कपाळी कुंकू लावले आहे. मिलिंदला वेगळ्या लूकमध्ये पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. त्यांनी त्याच्या लूकवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे.
‘पौरषपुर’ या वेब शोमध्ये मिलिंद सोमणसोबत अभिनेत्री शिल्पा शिंदे, शाहीर शेख, साहिल सलाथिया आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या शोचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करत आहेत. हा शो अल्टबालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून लवकरच शोचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.