बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मुलगी समिषा आज १५ फेब्रुवारी रोजी एक वर्षांची झाली आहे. त्यानिमित्ताने शिल्पाने तिचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पाने आजपर्यंत तिच्या मुलीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. समिषाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिषा ‘मम्मा’ बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये समिषा अतिशय क्यूट दिसत आहे.

आणखी वाचा : ‘व्हॅलेंटाईन डे’ला मराठमोळ्या सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या भावना, पाहा आजच्या दिवशीचे खास फोटो

आणखी वाचा : गँगस्टर अरुण गवळी होणार आजोबा, मुलीने दिली गोड बातमी

समिषाचा हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘मम्मा हे तुझ्या तोंडून ऐकणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… ‘ या आशयाचे कॅप्शन शिल्पाने दिले आहे.

२१ फेब्रुवारी २०२०मध्ये शिल्पा शेट्टीने आई झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. “ओम श्री गणेशाय नमः। आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका चमत्काराच्या रुपाने मिळाले आहे” अशा आशयाचे कॅप्शन देत शिल्पाने मुलीने तिचे बोट पकडतानाचा फोटो शेअर केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty shared a cute video of daughter samisha on her first birthday avb