भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते आणि ‘अमूल डेअरी’चे संस्थापक डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह याचे दिग्दर्शन करणार आहेत.

देशातील दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीत आमूलाग्र क्रांती करणाऱ्या वर्गिस यांना ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ असेही म्हटले जाते. ‘आय टू हॅड अ ड्रीम’ या पुस्तकावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. अमूल डेअरी, मिल्क मार्केटिंग फेडरेशन, इरमा, एनडीडी बोर्ड, त्रिभुवनदास फाऊंडेशन इत्यादी संस्थांची स्थापना करून गुजरातचे नाव कुरियन यांनी जगभर नेले. त्यांनी नेस्ले किंवा त्यांसारख्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना अंगावर घेत अमूलचा ब्रँड घडवला.

Super 30 first look: आकडेवारीत गुंतलेल्या हृतिकला पाहिलात का?

एकता कपूरच्या ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ निर्मित या चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या बॉलिवूडमध्ये आणखी एका बायोपिकची भर पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही. आता कुरियन यांची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांना किती आवडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.