नाटक, मालिका आणि चित्रपट केल्यानंतर बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकावे, असे प्रत्येकच लहान-मोठय़ा मराठी कलाकाराला वाटत असते. त्यातही बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारासोबत काम करायला मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मराठीतील श्रिया सचिन पिळगावकर हिला बॉलीवूड ‘खान’दानातील शाहरुख सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
बॉलीवूडमध्ये येण्याचे काही जणांचे ते स्वप्न पूर्ण होते, काहींना संघर्ष करावा लागतो, तर काहींचे ते स्वप्न भंग पावते. पण किमान एकदा तरी बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकावे, अशी सुप्त इच्छा कलाकारांमध्ये असते. शाहरुख खानच्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटात श्रियाला शाहरुखसोबत काम करण्याची आणि बॉलीवूडच्या मोठय़ा पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे.श्रियाने आपल्या वडिलांची सचिन पिळगावकर यांची निर्मिती असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर श्रिया आता बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर शाहरुख खान समवेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘फॅन’ चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. आयर्न खन्ना’ आणि त्याचा ‘फॅन’ असलेला ‘गौरव’ अशा भूमिका शाहरुखच्या आहेत. यात श्रिया ‘गौरव’बरोबर एका छोटय़ा भूमिकेत आहे.
शाहरुखसोबत काम करण्याचा आपला अनुभव खूप छान असल्याचे श्रियाचे म्हणणे आहे. बॉलीवूड स्टारची मुले किंवा मुली थेट मोठय़ा पडद्यावर झळकतात. श्रीया पिळगावकरच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
श्रिया पिळगावकर शाहरुखबरोबर झळकणार ‘फॅन’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण
नाटक, मालिका आणि चित्रपट केल्यानंतर बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकावे.
Written by मंदार गुरव
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-11-2015 at 01:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriya pilgaonkar debut in bollywood