बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. सैफ अली खान आणि करीना कपूरने स्वत:ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता सैफची बहिण अभिनेत्री सोहा अली खानने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर सैफची पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याचा मुलगा इब्राहिम खानने देखील कमेंट केली आहे.
सोहाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सैफ आणि करीनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अभिनंदन करीना. तू तुझी काळजी घे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने सैफचा फोटो देखील शेअर केला आहे.
सोहाच्या या पोस्टवर इब्राहिमने देखील कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये ‘अब्बा’ असे म्हणत आगचे इमोजी वापरले आहेत. बॉलिवूड मधील इतर कलाकारांनी देखील या पोस्टवर कमेंट करत करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.
करीनाने २०१२मध्ये सैफ अली खानशी लग्न केले. त्यांनतर २०१६मध्ये तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर तैमुर सोशल मीडियावर सतत चर्चेत होता. आता करीना प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.