अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली. तसेच न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. दरम्यान एनसीबीच्या या कारवाईविरोधात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने नाराजी व्यक्त केली आहे.
ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात
रियाला अटक झाली त्यावेळी तिने ‘पुरुषप्रधान व्यवस्थेला संपवू’, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला एक टीशर्ट परिधान केला होता. या टीशर्टवरील तो मजकूर शेअर करुन सोनम कपूरने रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. तसेच “आता काही लोक खूप आनंदात असतील कारण कोणाची तरी जबरदस्तीने शिकार केली जात आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून सोनमने रियाच्या अटकेला आपला विरोध दर्शवला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली
‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.