हटके अंदाजातल्या वधूच्या वेशातला सोनमचा लूक काही दिवसांपीर्वीचं ‘डॉली की डोली’च्या पोस्टरवर झळकला. त्यानंतर आता चित्रपट निर्मात्यांनी सोनमचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
या पोस्टरमध्ये ती हार्ली डेव्हिडसन ही बाईक चालविताना दिसते. सुपरमॅनचे टिशर्ट, शूज, जॅकेट आणि एव्हिएटर असा रावडी लूक तिला देण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या अवताराने तिच्या चाहत्यांमध्ये आता नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल. बॉलीवूडमध्ये ‘डॉली की डोली’ चित्रपटाने पदार्पण करणा-या अभिषेक डोग्राने याचे दिग्दर्शन केले असून ‘फुकरे’ चित्रपटातील अभिनेता पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव यांच्याही यात भूमिका आहेत. या चित्रपटात सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2015 रोजी प्रकाशित
सोनमचा नवा अवतार
हटके अंदाजातल्या वधूच्या वेशातला सोनमचा लूक काही दिवसांपीर्वीचं 'डॉली की डोली'च्या पोस्टरवर झळकला.

First published on: 06-01-2015 at 11:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor is one sporty bride in dolly ki doli