करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. अलिकडेच त्याने रोजगार गमावलेल्या मजुरांसाठी ई रिक्शा ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत तो मजुरांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहे.

अवश्य पाहा – बेरोजगारीमुळे निराश झालेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न

“चांगल्या भविष्यासाठी एक लहानसा प्रयत्न. ज्या बेरोजगार लोकांना व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे त्यांना ई-रिक्शा उपलब्ध करुन देतोय. चला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून सोनूने या नव्या मदतीची घोषणा केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. इच्छूकांनी sonusood.shyamsteelindia@gmail.com या इमेल आयडीवर मदतीसाठी अर्ज करावा.

अवश्य पाहा – ‘शेतकरी पिझ्झा का खावू शकत नाही?’; ट्रोलर्सला स्वरा भास्करचा संतप्त सवाल

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.