‘सगळी काळजी घेऊनही…’, चिरंजीवी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह

सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी माहिती दिली आहे.

देशात पुन्हा ३ लाखांपेक्षा जास्त करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अनेकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसत आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून सर्व काळजी घेत आहे.

चिरंजीवी यांनी ट्विटर अकाऊंटद्वारे करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘सर्व काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला काल रात्रीपासून करोनाची काही लक्षणे जाणवू लागली होती. मी स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करुन घ्या’ या आशयाचे ट्वीट चिरंजीवी यांनी केले आहे.

देशात सध्या २२ लाख ४९ हजार ३३५ सक्रिय रुग्ण उपचाराधीन असून पॉझिटीव्हीटी रेट २०.७५ टक्क्यांवर आहे. तर, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ६८ लाख ४ हजार १४५ वर पोहोचली आहे. विकली पॉझिटिव्हीटी रेट १७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १६२.२६ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South star cheeranjivi tested corona positive avb

Next Story
सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांची चाहत्यांना विनंती, शहनाजनंही शेअर केली पोस्ट
फोटो गॅलरी