चर्चेत राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी हल्ली सोशल मीडियाचा जोरदार वापर करतात. सोशल मीडियावर चित्रविचित्र कॉमेंट, फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करुन ते प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे सेलिब्रिटींवर अनेकदा ट्रोल होण्याची वेळ देखील येते. असाच काहीचा प्रकार अभिनेत्री सृष्टी रोडेसोबत घडला आहे. चाहत्यांना इंप्रेस करण्याच्या नादात तिने असा काही फोटो पोस्ट केला, की ज्यामुळे आता तिची खिल्ली उडवली जात आहे. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांमार्फत तिला विचारला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सृष्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावेळी तिने डोळ्यांखाली माचिसच्या काड्या चिकटवून एक फोटो पोस्ट केला आहे. या काड्या तिने बँडेजच्या साहाय्याने चिकटवल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे ‘मी आग आहे’ असं तिने या बँडेजवर लिहिलं आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या फोटोमुळे सृष्टीला जोरदार ट्रोल केलं जात आहे. ही नेमकी करतेय काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सृष्टी रोडे एक टीव्ही अभिनेत्री आहे. २००७ साली ‘कुछ इस तऱ्हा’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘ये इश्क है’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘इश्क किल्स’, ‘इश्कबाज’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. सध्या ती ‘किचन चँम्पियन’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srishty rode tapes matchsticks under her eyes mppg