आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षाकांचे मनोरंजन करणाऱ्या विनोदवीर सुनील ग्रोव्हरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो प्रसिद्ध हॉलिवूड गायीका ‘केटी पेरी’सोबत दिसत आहे. खरं तर हा फोटो मॉर्फ केलेला आहे. यात फोटो एडिटींगच्या माध्यमातून केटीचा फोटो लावण्यात आला आहे.
सुनील ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. “केटीच्या इतर चाहत्यांप्रमाणे मी देखील तिच्यासोबत आहे. ती खुप सुंदर आहे.” अशा शब्दात त्याने या फोटोवर कॉमेंट केली आहे. अर्थात हा फोटो त्याने केवळ गंमत म्हणून शेअर केला. परंतु या फोटोला सोशल मीडियावर जबरदस्त प्रसिद्धी मिळत आहे. काही तासात हजारो नेटकऱ्यांनी या फोटोवर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायीका केटी पेरी सध्या भारत दौऱ्यावर आहे. केटी जगातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मायकल जॅक्सन, जेनिफर लोपेज, रिहाना, मडोना यांसारख्या नामांकीत सुपरस्टार गायकांच्या यादीत स्थान मिळवलेल्या केटीची एक झलक पाहाण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे होतात. परंतु तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावून देखील प्रत्येकालाच तिला भेटण्याची किंवा तिच्या सोबत फोटो काढण्याची संधी मिळतेच असे नाही. अशा वेळी काही वेडे चाहते केटी सोबतचे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आणि मित्रमंडळींसमोर फुशारक्या मारतात. असाच काहीचा गंमतीशीर प्रकार अभिनेता सुनिल ग्रोव्हरने केला आहे.
