अभिनेत्री सनी लिओनी पती डॅनियल आणि मुलगी निशासोबत सध्या अमेरिकेतील अॅरिझोना येथे सुट्टयांचा आनंद घेत आहे. निशाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठीच ते अॅरिझोनाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच सनी आणि डॅनियलने निशाला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले होते. तिच्या संगोपनातही हे दोघे चांगलेच रुळले आहेत. निशाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिमुकल्या निशासोबत सनी आणि डॅनियल या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. मुलीचा वाढदिवस साजरा करतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. तर फुगे आणि बाहुलीसोबत उभ्या असलेल्या निशाच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव पाहायला मिळत आहेत. ‘हॅलो किट्टी’ अशी या बर्थडे पार्टीची थीम होती. सुरुवातीला निशासोबत संवाद साधण्यात त्यांना काही अडचणी येत होत्या. कारण निशाला मराठीशिवाय इंग्रजी किंवा हिंदी भाषा येत नाही. तर सनी आणि डॅनियलला मराठी येत नाही. पण, आता मात्र त्यांच्या या सर्व अडचणी हळूहळू दूर होताना दिसत आहेत. निशासुद्धा तिच्या आई-बाबांसोबत चांगली रुळली आहे असं म्हणायला हरकत नाही. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर निशाने आपल्या कुटुंबीयांसाठी भेटकार्ड रंगवले होते. ही अनोखी भेट तिने आपल्या नव्या कुटुंबीयांना देऊ केली होती.

PHOTO : इनायासोबत कुणालचे सुरेख क्षण

अॅरिझोनामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पोस्ट केले आहेत. सनीने लातूरमधून निशाला दत्तक घेतल्यापासून अनेकांनी तिच्या आणि डॅनियलच्या या निर्णयाची प्रशंसा केली. सनीने निशाला दत्तक घेण्याचा निर्णय घेत कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone and daniel weber celebrated daughter nisha kaur weber 2nd birthday in arizona see photo