अभिनेत्री सनी लिओनीने सेटवरील धमालमस्तीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. चित्रपटाच्या टीममधील एकाने केलेल्या प्रँकचा हा व्हिडिओ होता. सनी स्क्रिप्ट वाचत बसलेली असतानाच टीममधील एका सदस्याने तिच्याजवळ साप आणला, पाठमोऱ्या सनीला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. जेव्हा त्याने तो साप तिच्या अंगावर सोडला तेव्हा मात्र ती घाबरून धूम ठोकून पळाली. त्यावेळी सेटवर एकच हशा पिकल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळालं. या प्रँकचा बदला घेतल्याशिवाय सनी शांत बसणार नव्हती. बदला घेतानाचा व्हिडिओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये तिने दोन्ही हातात केक घेतला आहे. तिच्यावर साप सोडणाऱ्या व्यक्तीच्या मागून हळूच येऊन त्याच्या दोन्ही गालांवर केक लावून पळून जाते. ‘हा आहे माझा बदला…माझ्याशी केलेली मस्करी तुम्हाला महागात पडू शकते,’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय.

VIDEO : …जेव्हा किंग खान दीपिकाच्या आईने लिहिलेलं पत्र वाचतो

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा खळखळून हसाल हे नक्की.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone takes revenge of the prank and says do not mess with me