बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी रोज वेगळी माहिती समोर येत आहे. नुकताच ‘आजतक’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे म्हटले होते. सुशांतला विमानात बसायला भीती वाटायची आणि तो विमानात बसण्यापूर्वी काही औषधे घ्यायचा असे रियाने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या विषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान सुशांतच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत ‘क्लॉस्ट्रोफोबिया’ विषयी बोलताना दिसत आहे.
सुशांतने एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याला ‘क्लॉस्ट्रोफोबिया आणि इन्सोमनिया (झोप न येणे)’ असल्याचे म्हटले होते. ‘मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे आणि इन्सोमनिया असल्यामुळे मी फक्त दोन तास झोपतो’ असे सुशांत बोलताना दिसत आहे. सुशांतची ही मुलाखत पाहता रियाने दिलेली माहिती खरी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Claustrophobia #SushantSinghRajput https://t.co/x3RNrvXPCV pic.twitter.com/zVmNUzGGvY
— Sushant Mehta (@SushantNMehta) August 29, 2020
रियाने सुशांतला विमानात बसण्याची भीती वाटते हे सांगताच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत रियाला सडेतोड उत्तर दिले होते. तिने इन्स्टाग्रामवर सुशांतचा विमान उडवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ शेअर करत, ‘हे क्लॉस्ट्रोफोबिया claustrophobia आहे का? तुला नेहमीच विमान उडवायचं होतं आणि तू ते करून दाखवलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे’ असे तिने म्हटले होते.
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिया म्हणाली, ‘युरोप ट्रिपला जाताना सुशांतने मला सांगितले होते की त्याला विमानात बसताना भीती वाटते. त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे आणि त्यासाठी तो एक औषध घेत होता. त्या औषधाचे नाव modafinil असे होते. त्याच्याकडे हे औषध कायम असायचे. युरोप ट्रिपला जाताना विमानात बसण्यापूर्वी त्याने ते औषध घेतले होते.’