बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे. तो दोघे मुलांसाठी एकत्र वेळ घालवताना दिसतात. ते सतत सोशल मीडियावर मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो देखील शेअर करताना दिसतात. नुकताच सुझानने शेअर केलेल्या एका फोटोवर हृतिकने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मिरर सेल्फी काढतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘कधी कधी मला वाटते की मी मुलगा आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
तिचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. सुझानचा हा फोटो पाहता हृतिकने त्यावर कमेंट केली आहे. ‘हाहाहा.. फोटो चांगला आहे’ या आशयाची कमेंट त्याने केली आहे. चाहत्यांनी देखील सुझानच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने ‘तू अतिशय सुंदर दिसत आहेस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘तुझे केस खूप सुंदर आहेत’ असे म्हटले आहे.
काही दिवसापूर्वी सुझानने तिच्या आयुष्यात मुव्हऑन केल्याची चर्चा सुरू झाली होती. सुझान अभिनेता अली गोनीचा भाऊ अर्सलनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण त्यांच्यात मैत्रीचे नाते कायम आहे. सुझान आणि अर्सलनने त्यांच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.