‘नं. १ यारी’ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची मैत्री सर्वानाच माहिती आहे. पण त्यांच्या मैत्रीचे आजवर न ऐकलेले किस्से त्यांच्याकडून ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दर रविवारी ‘कलर्स’ वाहिनीवर ‘नं. १ यारी’ या कार्यक्रमात अशा अनेक सेलिब्रिटी जोडय़ा तुम्हाला त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगणार आहेत. सचिन पिळगावकर यांचं दिग्दर्शन व अभिनेता स्वप्निल जोशी याचं सूत्रसंचालन असा योग जुळून आलेला हा  कार्यक्रम १८ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्निल या सेलिब्रिटी मित्रांशी गप्पा मारणार आहे. त्यांचे अनुभव, माहीत नसलेले किस्से, गमतीजमती स्वप्निल त्यांच्यांकडून जाणून घेणार आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना स्वप्निल म्हणाला, ‘‘हा सेलिब्रिटी चॅट शो असला तरी यातील मैत्रीचा भाग महत्त्वाचा आहे. यामध्ये अनेक माहित नसलेल्या सेलिब्रिटी मित्रांच्या जोडय़ा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या जोडय़ांसोबत माझीही मैत्री असल्याने मलाही काही मजेशीर गुपित माहीत आहेत ज्याबाबत मी त्यांना पश्न विचारेन. दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी, या कार्यक्रमात फक्त गप्पा नसून रॅपिड फायर व अनेक मजेशीर खेळ आहेत ज्यामुळे गप्पा आणि मनोरंजन या मिलाफ या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे’, असे सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi and sachin pilgaonkar