बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कामयच चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. पण स्वरा देखील शांत बसत नाही. ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. नुकताच स्वराने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने साडी नेसली असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये स्वरा छान दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘एकटीची आफ्टर पार्टी’ असे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये स्वरा बादशाहच्या ‘तारीफा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

स्वराने २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यानंतर स्वरा ‘शीर कोरमा’ नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये केले होते.