‘सब टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक भूमिका लोकप्रिय आहे. मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानी एकीकडे नुकतीच प्रसूतीरजेवर गेली असताना आता आणखी एका कलाकाराची गच्छंती होणार असल्याची बातमी समोर येतेय. ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मालिकेत पत्रकार पोपटलालची भूमिका साकारणाऱ्या श्याम पाठकवर ही मालिका सोडण्याची वेळ येऊ शकते. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी आणि श्याम यांच्यामध्ये काही कारणास्तव झालेल्या वादामुळे श्यामला मालिका सोडण्यास सांगितले गेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीमुळे निर्माते आणि श्याममध्ये वाद झाल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिले आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप जोशी हे लंडनला एका कार्यक्रमामध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. तेथे गेल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी श्यामलाही बोलवण्याची विनंती दिलीप जोशींकडे केली. दिलीप आणि श्याम ही जो़डी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याने आयोजकांनी दोघांना एकत्र परफॉर्म करण्यास सांगितले. जराही वेळ न घालवता दिलीप यांनी श्यामला लंडनला कार्यक्रमासाठी बोलावून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही लंडन टूरबद्दल मालिकेच्या निर्मात्यांना कळवलं नव्हतं आणि इथूनच वादाला सुरुवात झाली.

वाचा : परदेशातही पोहोचणार सचिन खेडेकरांचा ‘बापजन्म’ 

आपण लंडनला असल्याचं न कळवल्याने ‘तारक मेहता…’चं शूटिंग त्यांच्याशिवाय करावं लागलं. मुंबईला परतल्यानंतर जेव्हा श्यामने निर्मात्यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात वाद झाला. इतकंच नव्हे तर त्याला सेटवरुन घरी जाण्यासही सांगण्यात आलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका विविध कारणांमुळे चर्चेत आहे. रोशन सिंग सोढी या पात्राला गुरु गोविंद सिंग यांच्या रुपात दाखवल्याचा आरोप करत ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ने मालिका बंद करण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah star shyam pathak had an argument with producer