छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने अनेकांना प्रकाशझोतात आणलं. त्यामुळे आज या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या ओळखीचा झालेला आहे. या मालिकेतील रिटा रिपोर्टर अर्थात अभिनेत्री प्रिया अहुजा राजदा लवकरच आई होणार आहे. काही दिवसापूर्वी तिने आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर आता तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप दिसून येत आहे.

नुकताच प्रियाचं बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी ‘तारक मेहता..’च्या टीममधील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता प्रियाने एक नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये प्रियाच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर प्रियाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.

 वाचा : Photo: ‘अग्गंबाई सासूबाई’तील मॅडी खऱ्या आयुष्यात कशी दिसते पाहा

दरम्यान, प्रियाने गुजराती दिग्दर्शक मालव राजदा याच्यासोबत लग्न केलं आहे. मालव राजदा हे ‘तारक मेहता उल्टा चष्मा’चे चीफ डायरेक्टर आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर प्रिया आणि मालवची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.