अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाची तैमुरची लोकप्रियता कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. एवढ्या लहान वयामध्ये तैमुर हसत हसत कॅमेरासमोर जातो. इतकंच नाही तर तो फोटोग्राफर्सला पाहिल्यानंतर त्यांच्याशी मस्तपैकी गप्पाही मारतो. त्यामुळे तैमुर कुठेही गेला तरी फोटोग्राफर्स त्याची छबी उतरविण्यासाठी पुढे सरसावतात. अनेक वेळा तैमुर आपल्या आई-वडिलांसोबत त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर जात असतो. नुकतीच तैमुरने आमिर खानच्या लालसिंग चढ्ढाच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी त्याचा सेटवरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
आमिर खानच्या ‘लालसिंग चढ्ढा’मध्ये करिना कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रीकरणावेळी तैमुरदेखील आई करिनासोबत सेटवर गेला होता. यावेळी तैमुरचा मस्ती करतानाचा एक व्हिडीओ करिनाच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.
सध्या ‘लालसिंग चढ्ढा’चं चंदीगढमध्ये चित्रीकरण सुरु आहे. या सेटवर तैमुर मस्ती करत असून इकडून-तिकडे बागडताना दिसत आहे. त्यामुळे तैमुर या सेटवर प्रचंड मजा-मस्ती करताना दिसून येत आहे.
दरम्यान, अनेक वेळा करिना तिच्यासोबत तैमुरला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जात असते. सध्या करिना ‘लालसिंग चढ्ढा’मध्ये व्यस्त असून काही दिवसांपूर्वीच तिचा सेटवरील फोटो लीक झाला होता. या लूकमध्ये अत्यंत साध्या वेशात दिसत आहे.
