भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या वेडिंग रिसेप्शनमधील खरे स्टार होते असे म्हणण्यास हरकत नाही. या रिसेप्शनला विरुष्काच्या निकटवर्तीयांनी आणि केवळ जवळच्या मित्रमंडळींनीच हजेरी लावली होती. या रिसेप्शनसाठी खास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान आणि अर्थमंत्री येणार म्हणून पोलिसांनी काही वेळासाठी रस्तेही बंद केले होते. या दोन महत्त्वाच्या नेत्यांव्यतिरीक्त आणखी एका व्यक्तीने विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा ‘सेलिब्रिटी’ दुसरा तिसरा कोणी नाही तर क्रिकटपटू शिखर धवनचा मुलगा झोरावर होता. शिखरसोबत त्याची पत्नी आएशासुद्धा रिसेप्शनला उपस्थित होती.
वाचा : जाणून घ्या, अनुष्का शर्माच्या रॉयल ज्वेलरीची किंमत
विराटला पंजाबी गाण्यांची फार आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये प्रसिद्ध गायक गुरुदास मान यांच्या गाण्यांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुदास मान यांच्या गाण्यांवर कोहलीने झोरावर आणि शिखरसह ठेकाही धरला. त्यातही सध्या सोशल मीडियावर अनुष्का आणि झोरावरचा एक फोटो सर्वांचेच लक्ष वेधतोय. या फोटोत झोरावर अनुष्काच्या कुशीत झोपलेला दिसतो.
वाचा : प्रिंस हॅरी-मेगन मार्कलच्या साखरपुड्याचे रॉयल फोटो
विराट आणि अनुष्काने रिसेप्शनमध्ये स्टेजवर येऊन सर्वांचे स्वागत केले. यावेळी विराटने तुम्ही सर्वजण येथे उपस्थित राहण्यासाठी धन्यवाद, असे म्हणत प्रसार माध्यमांचे आभार मानले तर अनुष्काने हात जोडून सर्वांना नमस्ते केले. या रिसेप्शनला जवळपास ५०० पाहुणे हजर होते. विराट मुळात दिल्लीचा असल्याने या पाहुण्यांमध्ये त्याच्याच निकटवर्तीयांची हजेरी अधिक पाहावयास मिळाली. विरुष्काच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमांमधील कपडे डिझाइन करणारे प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची मुखर्जीसुद्धा यावेळी शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.