प्लास्टिक सर्जरीकडे आज बॉलिवूडमधील एक सामान्य गोष्ट म्हणून पाहिलं जातं. अनेक कलाकार अधिक सुंदर दिसण्यासाठी या शस्त्रक्रियेची मदत घेतात. शस्त्रक्रियेनंतर कलाकारांच्या चेहऱ्यामध्ये अमुलाग्र बदल होतो. दरम्यान अभिनेता टायगर श्रॉफ यानं सर्जरीनंतर चेहऱ्यामध्ये झालेला हा बदल जाणिवपूर्वक आपल्या चाहत्यांना दाखवला आहे.
अवश्य पाहा – ‘नग्न असताना मला अधिक आध्यात्मिक वाटतं’; टीकाकारांवर सोफिया संतापली
टायगरनं इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. २०१४ साली त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र पदार्पण करण्यापूर्वी तो कसा दिसायचा हे त्याने या फोटोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दाखवलं आहे. “करिअरच्या सुरुवातीस मी असा दिसायचो. दाढी सोडून दुसरा कुठला बदल माझ्या चेहऱ्यात जाणवत नाही.” अशा आशयाची कॉमेंट त्याने फोटोवर केली आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अवश्य पाहा – ‘तुरुंगातून सुटताच सूड घेईन’; अभिनेत्रीला मिळाली जीवे मारण्याची धमकी
अवश्य पाहा – अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट
टायगर हा बॉलिवूडमधील सध्या आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. २०१४ साली ‘हिरोपंती’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. उत्तम डान्स आणि अॅक्शन शैली यामुळे पहिल्याच चित्रपटातून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु त्याच्या लूकमुळे काही जणांनी त्यांची खिल्ली देखील उडवली होती. त्यानंतर प्लास्टिक सर्जरीद्वारे त्याने आपल्या लूकमध्ये थोडा बदल केला. त्याच्या बिफोर आणि आफ्टर सर्जरी लूकमध्ये फारसा बदल झालेला नाही असं मत टायगरने व्यक्त केलं.