छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाईं या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने एक ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे लक्षवेधी फोटो सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत.
हे फोटो शूट अक्षयाने गोव्यात केले आहे. या फोटोंवर आतापर्यंत तब्बल एक लाख ३१ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
अक्षयाच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेविषयी बोलायचे तर ‘अंजली बाई’, ‘राणादा’ची निरागस प्रेम कहाणी सध्या एका वेगळ्या वळणावर प्रवास करत आहे. मालिकेच्या कथानकाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. टीआरपीमध्येही ही मालिका आघाडीवर आहे. या मालिकेने अभिनेता हार्दिक जोशी (राणा) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (अंजली पाठक) यांच्या अभिनय कौशल्यालाही दाद मिळत आहे. त्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे.