इंटरनेट, सोशल मीडिया, सेल्फी या गोष्टी आता जणू व्यसन झाल्या आहेत. अनेकदा मोबाईलच्या नादात अपघात झाल्याचे किंवा काही ना काही दुर्घटना घडल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. या सर्व व्यसनांपायी आपल्याला कोणत्या दुर्घटनेला किंवा वाईट गोष्टीला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही. मोबाईलचा हाच नाद एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला भारी पडला. मोबाईलच्या आहारी गेलेली टिव्ही अभिनेत्री निती टेलरची रातोरात मालिकेतून हकालपट्टी करण्यात आलीये. ‘गुलाम’ या मालिकेतील शिवानीच्या भूमिकेसाठी निती प्रसिद्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : आदेश बांदेकरांच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवडीला निलेश राणेंचा विरोध

‘बॉलिवूड लाइफ’ वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या आहारी गेलेली निती सेटवर असूनही नसल्यासारखीच असते. बघावं तेव्हा ती फोनवर असते आणि तिला देण्यात आलेली स्क्रिप्टही ती वाचत नाही. त्यामुळे कामाप्रती असलेला तिचा निष्काळजीपणा सतत दिसून येतो. याव्यतिरीक्त सहकलाकारांसोबतची तिची वागणूक आणि तिचे सतत बदलत राहणारे मूड यामुळे मालिकेची नकारात्मक प्रसिद्धी होत आहे. इतकंच नव्हे तर सेटवरील तिचे सहकलाकार परम सिंग आणि विकास मनकतला हेदेखील तिच्यापासून दोन हात दूर राहणचं पसंत करतात.

वाचा : ‘चांगले रक्त कधीच वाईट बोलू शकत नाही’

सध्या मालिकेचे निर्माते मुख्य भूमिकेसाठी एखाद्या सक्षम अशा अभिनेत्रीच्या शोधात आहेत. नितीच्या भूमिकेसाठी सनाया इराणी आणि एकता कौल या दोन अभिनेत्रींची नावं आघाडीवर आहेत. मालिका पुन्हा रिलाँच करण्यात येणार असल्याने निर्मात्यांचा एका प्रसिद्ध अभिनेत्रीचीच निवड करण्याकडे कल आहे.

‘कैसी हे ये यारीया’ या व्ही वाहिनीवरील मालिकेने नितीने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेतील मुख्य अभिनेता पार्थ समंथन याच्याशी देखील नितीचे बऱ्याचदा खटके उडायचे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress niti taylor was thrown out of her show overnight because of her phone addiction