द कपिल शर्मा शोमध्ये बबली मौसी ही व्यक्तिरेखा साकारणारी टिव्ही अभिनेत्री उपासना सिंग या कार्यक्रमाशी निगडीत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन वैतागली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले की, हलक्या- फुलक्या व्यक्तिरेखा साकारण्यात आता तिला फारसा रस नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून ती या कार्यक्रमापासून दूर होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मान्यताची अशी झाली संजयच्या आयुष्यात एण्ट्री

याबद्दल बोलताना उपासना म्हणाली की, ‘माझा कपिल शर्मासोबत कोणताही वाद नाही. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात हातावर मोजता येतील एवढेच कलाकार होते. शिवाय या कार्यक्रमाचा करार संपेपर्यंत आम्ही इतर कोणत्याही वाहिनीसोबत काम करु शकत नव्हतो. पण ‘द कपिल शर्मा शो’मध्ये असे काही नाही. मी या कार्यक्रमासोबत इतर वाहिनींच्या कार्यक्रमांमध्येही काम करु शकते. सध्या एका रिअॅलिटी शोसोबत चर्चाही सुरू आहे. पण मी इतक्यातच त्याबद्दल काही बोलू शकत नाही.’

सध्या सोशल मीडियावर उपासनावर आरोपांचा भडीमार होत आहे. यावर उपासना म्हणाली की, ‘सध्या मी परदेशातही काही कार्यक्रम करतेय. दुबईमध्ये मी सुनील ग्रोवरसोबत एक शो करतेय तर कॅनडामध्ये एक पंजाबी शो करतेय. आतापर्यंत मी अनेक मालिका केल्या आहेत. आता मला त्याच कपड्यांमध्ये आणि त्याच व्यक्तिरेखांमध्ये राहायचे नाही. आता मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. आता माझी एकाच प्रोजेक्टमध्ये वर्षांनुवर्षे काम करण्याची इच्छा नाही. मी नच बलियेमध्ये नाही असं जेव्हा लोक बोलू लागले तेव्हा मला फार वाईट वाटले. फक्त ‘द कपिल शर्मा शो’वर माझी मिळकत अवलंबून नाहीये. सध्या माझ्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. मी दोन सिनेमांचे चित्रीकरणही करत आहे. यातला एक सिनेमा म्हणजे वरुण धवनचा ‘जुडवा २’ आणि दुसरा ‘ये पिक्चर पाकिस्तान में बैन है”.

प्रभास-अनुष्काने लावला हिंदीचा क्लास!

गेल्या आठवड्यात ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्ध शायर डॉक्टर राहत इंदौरी, कवी डॉक्टर कुमार विश्वास आणि शायर शबीना अदीब आले होते. या तिघांनी एकाहून एक सरस कविता आणि शायरी ऐकवल्या. त्यांच्या अनेक शायरी या लोकांना पोट धरून हसायला भाग पाडले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upasna singh slams kapil sharma show says not dying without the kapil sharma show