मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही सध्या चर्चेत आहे. या चर्चा तिने सोशल मीडियावर बेबी बंपसोबत फोटो शेअर केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. उर्मिलाने १ एप्रिल रोजी हे फोटो शेअर केल्यामुळे अनेकांना ती फिरकी घेत असल्याचे वाटत होते. पण तिने हे फोटो शेअर करत ‘हे एप्रिल फूल नाही’ असे म्हणत गूड न्यूज दिली आहे.
उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘मी लवकरच आई होणार आहे. (हे एप्रिल फूल नाही)’ असे म्हटले आहे. चाहत्यांनी उर्मिलाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी उर्मिलाने मॅटरनिटी फोटोशूट केले आहे. त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे.
उर्मिलाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘दुहेरी’ ही तिची मालिका विशेष गाजली होती. तिने ‘दिया और बाती हम’,’मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे.
