गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. आता चर्चा सुरु झाली आहे, ती वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांच्या लग्नाची. गेल्या कित्येक दिवसांपासून ही जोडी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. वरूण धवन या महिन्यात नताशाशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, वरूण लग्नाचं स्थळ शोधत आहे. वरूण आणि नताशा अलिबागमध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय. ते नुकताच पंचतारांकित हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. हे एक ग्रँड पंजाबी लग्न असेल. परंतु करोना व्हायरसमुळे या लग्नात फक्त जवळचे लोक उपस्थित असणार आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी २०० लोकांची यादी तयार केली आहे.
रेशीमगाठ! अभिज्ञा-मेहुलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
वरूण आणि नताशा बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. वरुणने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला नताशा आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल जग जाहिर केले नव्हते. परंतु या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र पाहिले गेले आहे. या आधी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत, वरूणने त्याच्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, सगळे या विषयी बोलत आहेत. पण जगभरात आता खूप काही सुरू आहे. जर सगळं आधीसारखं स्थिरावलं तर लवकरच मी लग्नाच्या तयारीला लागू शकतो.