बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक अडथळे येत असल्याचे दिसत आहे. नुकताच वरुण धवनच्या विश्वासू गाडी चालकाने चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्पॉटबॉय-ई’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात ‘कूली नंबर १’ चित्रपटाचे चित्रीकरण एनडी स्टूडीयो, कर्जत येथे सुरु असताना एक अनपेक्षित घटना घडली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अचानक मुलगी चालत वरुण धवनकडे येते आणि त्याच्या गाडी चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगते. ते ऐकून वरुणला धक्काच बसतो. वरुणने लवकरच या विरुद्ध पाऊल उचलणार असल्याचे अश्वासन त्या मुलीला दिले आहे.

वरुणच्या गाडी चालकाचे नाव मनोज असे आहे. तो गेल्या कित्येक वर्षांपासून वरुणचा गाडी चालक म्हणून काम करत आहे. पण त्याच्या गैरवर्तणुकीमुळे वरुणने त्याला तडकाफडकी कामावरुन काढून टाकले आहे.

‘कूली नंबर १’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेला अभिनेता गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपट निर्मात्यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट १ मे २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan sacks his driver for misconduct on the sets of coolie no 1 avb