बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या सौंदर्याबद्दल बोलावे तितके कमी आहे. तैमुरच्या जन्मानंतर करिनाच्या शरीरयष्टीत बरेच बदल झाले होते. मात्र, प्रसूतीनंतर अवघ्या काही महिन्यांतच ही अभिनेत्री पूर्ववत झाली. स्टायलिश राहण्यासोबतच तिचे फिटनेसकडेही बरेच लक्ष असते. ग्लॅमरस लूकमध्ये परतलेल्या करिनाचा अदांचा नजराणा नुकताच एका फॅशन शोमध्ये पाहावयास मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Inside Photo वाचा : सागरिका घाटगेचा ‘मेहंदी कार्यक्रम’

केनियाची राजधानी नैरोबी येथे शनिवारी रंगलेल्या एका फॅशन शोमध्ये करिनाने आपल्या ग्लॅमरचा तडका लावला. सर्वात जवळचा मित्र आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी ती रॅम्पवर उतरली आणि आपल्या खास अंदाजाने तिने सगळ्यांची मनं जिंकली. जणू एखादी अप्सराच रॅम्पवर अवतरल्याचा भास यावेळी झाला. ड्रेसिंग स्टाइल आणि रॅम्पवरील आत्मविश्वासामुळे बेबो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

वाचा : उमा देवी ते टुनटुन, जाणून घ्या प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्रीचा प्रवास

सध्या करिना ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाचे दिल्लीतील एक शेड्यूल पूर्ण करून नुकतीच करिना मुंबईत परतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video kareena kapoor khan stuns as she walks down the ramp for manish malhotra