‘सनई चौघडे’ आणि ‘वळू’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांची निर्मिती करणारे सुभाष घई आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
‘विजेता’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सुबोध भावे याने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर पाहूनच हा चित्रपट खेळावर आधारित असल्याचे दिसत आहे. सुबोध भावे, पूजा सावंत, पूजा बिष्ट, माधव देवचक्के, सुशांत शेलार व देवेंद्र चौघुले अशी मल्टिस्टार कास्ट असणारा हा चित्रपट आहे.
अनेक पराभवानंतरही जो टिकून राहतो तोच खरा ‘विजेता’#विजेता #Vijeta #12March2020@SubhashGhai1 @meghnaghaipuri @parifarooqui @sooreshpai @subodhbhave @IAmPoojaSawant @madhavdeochake @PritamKagne @ashishgharde01 @MuktaA2Cinemas @MuktaArtsLtd pic.twitter.com/5AJxe6yKSN
— सुबोध भावे (@subodhbhave) February 2, 2020
या पोस्टरमध्ये पूजा सायकलिंग करताना तर नेहा धावताना दिसत आहे. तसेच विविध प्रकारचे खेळ या पोस्टवर पाहू शकतो. सुबोध भावे, नेहा महाजन व पूजा सावंत हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. नेहमीप्रमाणेच सुबोध या चित्रपटातून कोणती भन्नाट व्यक्तिरेखा साकारणार हे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘विजेता’ येत्या १२ मार्चला प्रदर्शित होणार आहे.