महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलावरील ‘विठू माऊली’ ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी दररोज संध्याकाळी सात वाजता मालिकेचे प्रसारण होणार आहे.
निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे व आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली आहे. लोकोद्धारासाठी अवतार घेतलेल्या विठ्ठलाचे महत्त्व आणि त्याची महती मालिकेतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच विठ्ठलाचे रुक्मीणी व सत्यभामा यांच्याशी असलेले नातेही उलगडले जाणार आहे. कोठारे व्हिजनतर्फे पुन्हा एका पौराणिक विषयावरील मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी ‘स्टार प्रवाह’कडून या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. मालिकेत कलाकार कोण असतील त्यांची नावे मात्र वाहिनीने जाहीर केलेली नाहीत.