हल्ली वाढलेले वजन हे प्रत्येकाच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. हे वजन कमी करण्यासाठी अनेक जण नानाविध उपायही सतत करत असतात. टिव्हीवर याच्या अने जाहिरातीही सतत येत असतात. बाजारात यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनेही मोठ्या प्रमाणात विकायला ठेवली जातात. पण तुम्हाला माहित आहे का अशा पद्धतीने वजन कमी करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बाबतीत घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड

लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात विवेक शौक या अभिनेत्याने आपला जीव गमावला. ‘उल्टा-पुल्टा’ आणि ‘फ्लॉप शो’ मधून त्यांनी प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती.  ३ जानेवारी २०११ ला त्यांनी वजन कमी करण्यासाठीचे ऑपरेशन केले होते. मात्र ऑपरेशननंतर सात दिवसांतच म्हणजे १० जानेवारी २०११ मध्ये त्यांचे निधन झाले.

‘गदर’मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती. त्यांनी ‘बरसात की रात’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते तर ‘ऐतराज’ या सिनेमात त्यांनी अक्षय कुमारच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय, ‘लाईफ पार्टनर’, ‘क्रेझी ४’, ‘रकीब’, ‘जमीर’, ‘किसना’, ‘दम’, ‘२३ मार्च १९३१ शहीद’ या सारख्या सिनेमातही त्यांनी काम केले होते.

.. हे आहेत ऑनस्क्रिन आई-वडिलांनाच डेट करणारे सेलिब्रिटी

विवेक यांचा जन्म चंदिगढ येथे झाला होता. विवेक यांनी आपले करिअर जसपाल भट्टी यांच्यासोबत ‘उल्टा पुल्टा’ आणि ‘फ्लॉप शो’ या दुरदर्शनवरील मालिकेतून केले होते. याशिाय ‘नॉनसेन्स क्लब’चे ते एक संस्थापक सदस्यही होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek shauq was dead after 7 days of liposuction surgery