जेव्हा ४५ वर्षाचा प्रौढ पुरूष खट्याळपणा करतो तेव्हा काय काय मजेशीर घटना घडतात हे अनुभवण्यासाठी राम कपूर आणि सनी लिओनीचा ‘कुछ कुछ लोचा है’ हा आगामी चित्रपट पहावयास हवा. या विनोदी चित्रपटात राम कपूरने ४५ वर्षीय खट्याळ प्रौढ पुरूषाची भूमिका बजावली आहे. चित्रपटात राम कपूर एका गुजराती व्यावसायिकाची व्यक्तिरेखा साकारत असून, या व्यक्तिरेखेला अनेक विनोदी छटा आहेत. तर सनी लिओनी नेहमीप्रमाणे एका नटखट सुंदरीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ८ मे ला प्रदर्शित होणार असून, नुकताच चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आणि पोस्टर प्रसिध्द करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट प्रेषकांचे पुरेपुर मनोरंजन करणार असे दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2015 रोजी प्रकाशित
पाहा : सनी लिओनी आणि राम कपूरचा ‘कुछ कुछ लोचा है’
जेव्हा ४५ वर्षाचा प्रौढ पुरूष खट्याळपणा करतो तेव्हा काय काय मजेशीर घटना घडतात हे अनुभवण्यासाठी राम कपूर आणि सनी लिओनीचा 'कुछ कुछ लोचा है' हा आगामी चित्रपट पहावयास हवा.
First published on: 31-03-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer sunny leone ram kapoors kuch kuch locha hai