लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीमधील सर्वच कलाकार घरात बसून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संदेश साधत असून घरात बसून टिक-टॉक व्हिडीओ करत असल्याचे पाहायला मिळते. या कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे सनी लिओनी. नुकताच तिने घरात लादी पुसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॉकडाउनच्या काळात सनी टिक-टॉकवर मजेशीर व्हिडीओ करुन चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. सध्या सर्व कलाकार योगा, एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत पण सनीने मात्र ग्लॅमरस अंदाजात घरातील काम करताना व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केला असून त्यावर सोनेरी रंगाची ज्वेलरी घातली आहे. सनीचा हा ग्लॅमरस आणि हॉट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तसेच व्हिडीओमध्ये ती गायिका एरियाना ग्रांडेच्या गाण्यावर डान्स करत लादी पुसताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने जर मला जबरदस्ती घरातली लादी पुसायला लावली तर मी अशी पुसेन असे कॅप्शन दिले आहे.

सनीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच काही मिनिटांमध्ये व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video when sunny leone forced to clean floor and she did it in style avb