हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथ सूत्रसंचालक क्रिस रॉकवर (Chris Rock) अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली होती. त्यानंतर विल स्मिथवर ऑस्करने कडक कारवाई केली आहे. विल स्मिथवर आता ऑस्कर अकादमीनं १० वर्षांची बंदी घातली आहे. अकादमीच्या या कारवाईवर आता विल स्मिथनं प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकादमीनं केलेल्या कारवाईनंतर बोलताना विल स्मिथ म्हणाला, ‘अकादमीनं घेतलेल्या या निर्णयाचा मी आदर करतो आणि मी त्यांचा निर्णय स्वीकारतो.’ विल स्मिथवर कारवाई केल्यानंतर अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी डॉन हडसन म्हणाले, “९४ व्या ऑस्करचा उद्देश गेल्या वर्षी अविश्वसनीय काम केलेल्या अनेक लोकांचा उत्सव साजरा करणं हा होता. मात्र या सगळ्यात विल स्मिथच्या अशा वागण्याने हे सगळं विस्कळीत झालं.”

आणखी वाचा- नाना पाटेकर यांच्या ‘द कन्फेशन’चा टीझर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

दरम्यान आता या कारवाईनंतर पुढील १० वर्ष विल स्थिम ऑस्करच्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेऊ शकणार नाही. विलने २८ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवल्याबद्दल सुत्रसंचालक ख्रिस रॉकला कानशिलात लगावली होती. या प्रकरणाच्या ११ दिवसानंतर ऑस्करने विल स्मिथवर कारवाई केली आहे आणि त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्याचा चित्रपटही रद्द करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will smith reaction after oscar academy ban him for 10 years mrj