कुर्ल्यातील पीव्हीआर चित्रपटगृहात चित्रपटाच्या शो दरम्यान ‘तमाशा’ पाहायला मिळाला. राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने एका कुटुंबावर उपस्थित प्रेक्षक चांगलेच संतापले आणि वाद निर्माण झाला.
कुर्ल्यातील फिनिक्स मार्केट सिटीमधील पीव्हीआर चित्रपटगृहात ‘तमाशा’ चित्रपटाच्या शो दरम्यान ही घटना घडली. नेहमीप्रमाणे चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, त्यावेळी एक कुटुंब राष्ट्रगीतासाठी उभं राहिलं नाही. त्यामुळे उपस्थितांनी राष्ट्रगीत संपल्यानंतर जाब विचारला. त्यानंतर प्रेक्षक आणि कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली. अखेर संतापलेल्या प्रेक्षकांनी या कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवला.
या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करून एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर अपलोड केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने चित्रपटगृहात ‘तमाशा’
कुर्ल्यातील पीव्हीआर चित्रपटगृहात चित्रपटाच्या शो दरम्यान 'तमाशा' पाहायला मिळाला.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 30-11-2015 at 10:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argument over national athem family expelled from theatre