बॅँक आणि एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या ‘इंडियन कॅश मॅनेजमेंट सव्‍‌र्हिस’ची गाडी गुरुवारी सकाळी पाच ते सहा दरोडेखोरांनी लुटली. गाडीमध्ये दहा लाखाची रोकड होती. विविध एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या या गाडीमध्ये सशस्त्र सुरक्षा व्यवस्था नव्हती.
खारघर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ कॅश मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसची गाडी उभी होती. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची सफारी गाडीतून आलेल्या पाच ते सहा तरुणांनी गाडीमधील कर्मचाऱ्याच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून मारहाण केली. त्यानंतर गाडीमधील दहा लाख लुटून नेले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली़