कांदिवली येथे रविवारी संध्याकाळी अस्मिता शिंदे (३६) नावाच्या डॉक्टरच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणामुळे तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
  चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिमेच्या आरएनए पार्कमध्ये पत्नी अस्मिता आणि नऊ वर्षांच्या मुलीसह डॉ अंबर शिंदे राहत होते. रविवारी संध्याकाळी पतीसोबत कुठल्यातरी कारणावरु न तिचे भांडण झाले.
रागाच्या भरात अस्मिताने आतल्या खोलीत जाऊन स्वत:ला कोंडून घेतले. बराच वेळ तिने दार न उघडल्याने ते तोडण्यात आले. आतमध्ये पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत अस्मिताचा मृतदेह आढळून आला. तिने कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती. घटनेच्या वेळी त्यांची मुलगी नातेवाईकांकडे होती.
अस्मिता हिचा १२ वर्षांपूर्वी डॉ. अंबर यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून अस्मिताने आपल्या घरच्यांशी संबंध तोडले होते. यावरुन बऱ्याच वेळा ती नाराज असायची. त्यामुळेही त्यांच्यात खटके उडत होते. रविवारी नेमक्या कुठल्या मुद्दय़ावरुन दोघांमध्ये भांडण झाले, तिला आत्महत्येला प्रवृत्त केले गेले का याचा चारकोप पोलीस तपास करत  आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor wife suicide in kandivali