आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणारी तरुण दिग्दर्शिका गौरी शिंदे मंगळवारी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये सहभागी होणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा’ या पुरवणीच्या सेलिब्रिटी संपादिका सोनाली कुलकर्णी तिच्याशी मुक्त संवाद साधणार असून, कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणी आणि महिलांनाही गौरी शिंदेला आपल्या मनातील प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, रवींद्र नाटय़ मंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम सर्व महिला आणि तरुणींसाठी विनामूल्य खुला आहे.
‘इंग्लिश विंग्लिश’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठमोळ्या गौरीने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. ‘‘ती’च्या यशासाठी..’ अशा टॅगलाइनने सुरू झालेल्या या कार्यक्रमात आतापर्यंत सोनाली बेंद्रे, अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, बेला शेंडे, आरजे मलिष्का आणि आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर सहभागी झाल्या होत्या. तरुणी आणि महिलांनीही मनमोकळेपणे त्यांच्याशी संवाद साधला होता.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘व्हिवा लाऊंज’मध्ये आज दिग्दर्शिका गौरी शिंदे
आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणारी तरुण दिग्दर्शिका गौरी शिंदे मंगळवारी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये सहभागी होणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा’ या पुरवणीच्या सेलिब्रिटी संपादिका सोनाली कुलकर्णी तिच्याशी मुक्त संवाद साधणार असून, कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणी आणि महिलांनाही गौरी शिंदेला आपल्या मनातील प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-11-2012 at 05:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gouri shinde in viva lounge today