राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी चर्चगेट रेल्वे स्थानकाला भेट देऊन महिला प्रवाशांशी संवाद साधला आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी महिलांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचताना रेल्वेतील फेरीवाले आणि तृतीय पंथीयांना आवरावे अशी मागणी केली.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास चर्चगेट स्थानकाला भेट दिली. त्यांच्या या भेटीची कोणालाही कल्पना नसल्यामुळे रेल्वे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पाटील यांनी तेथे गाडीची वाट पाहत असलेल्या महिलांशी सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.