जुहू येथील नरसी मोनजी शाळेतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी बसच्या चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात आला असून बसचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
कोणत्याही बसमध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती बसचालकाला असते. त्यामुळेच जुहू प्रकरणातील बसमध्ये नेमके काय घडत आहे याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचा बस चालकाचा दावा अमान्य करण्यात आला आहे. त्याचा परवाना मोटार वाहन कायद्याच्या १९ व्या कलमानुसार कायमचा रद्द करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे ज्या बसमध्ये हा प्रकार घडला त्या बसला फक्त मुंबईमध्ये प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती. त्यामुळे या बसचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhu molestation case bus owner licence cancelled permanently