स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रविक्री व्यवसायात राहून आधुनिक भारतीय कलेचा इतिहास घडविणारे गॅलरी केमोल्डचे संस्थापक व माजी संचालक केकू गांधी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.केकू यांच्या पार्थिवाचे दहन शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी करण्यात आले. त्या वेळी मुंबईतील महत्त्वाचे कलादालन चालक व अव्वल चित्रकार उपस्थित होते. ‘माझे अनेक मित्र पारशी नाहीत, त्यांच्याप्रमाणे माझ्यावरही दहनसंस्कार होणे आवडेल’ अशी केकू यांची इच्छा असल्याचे त्यांचे पुत्र आदिल म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2012 रोजी प्रकाशित
कला व्यवसायाचे भीष्माचार्य केकू गांधी कालवश
स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रविक्री व्यवसायात राहून आधुनिक भारतीय कलेचा इतिहास घडविणारे गॅलरी केमोल्डचे संस्थापक व माजी संचालक केकू गांधी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले.

First published on: 11-11-2012 at 02:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keku gandhi dead