उमेदवारांची माहिती तांत्रिक कारणांमुळे ‘करप्ट’ झाल्याने रद्द करावी लागलेली ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा’ आता १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. राज्यभरातून २ लाख ९८ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या उमेदवारांची ओळखपत्रे तयार करताना उमेदवारांची माहिती करप्ट झाल्याने आयोगाने उमेदवारांकडून माहिती मागविण्यास सुरूवात केली. पण, तांत्रिक कारणांमुळे अनेक उमेदवारांना दिलेल्या मुदतीत माहिती अपडेट करणे शक्य न झाल्याने आयोगाला ७ एप्रिलला होऊ घातलेली ही परीक्षा रद्द करावी लागली होती. आतापर्यंत २ लाख ६० हजार उमेदवारांनी आपली माहिती अपडेट केली आहे. उर्वरित उमेदवारांनीही लवकरात लवकर आपली माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट करावी, असे आवाहन  केले आहे.