उल्हास नदी पाणीसाठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघू पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. ठाणे शहराला स्टेम पाणीपुरवठा विभागाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी, १ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते २ जानेवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात ठाणे शहर, महागिरी, ऋतुपार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, रेतीबंदर, मुंब्रा परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे ठाणे पालिकेने कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
ठाण्याचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
उल्हास नदी पाणीसाठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघू पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. ठाणे शहराला स्टेम पाणीपुरवठा विभागाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी, १ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते २
First published on: 30-12-2012 at 02:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water supply in thane on tuesday