स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. सरस्वती व सुदाम मुंडे या दाम्पत्याला परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता जामीन नाकारण्याऐवजी त्यांची जामिनावर सुटका करणारे अंबाजोगाई (बीड) येथील जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. महाजन यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने निलंबित केले आहे.
त्याबाबतची नोटीस उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये महाजन यांच्या निलंबनाचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही.
महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अत्यंत कमी आहे. त्यातच मुंडे दाम्पत्याने कर्तव्य बाजूला सारून सर्रासपणे स्त्री भ्रूणहत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हे दाम्पत्य बरेच महिने फरारी होते. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करता महाजन यांनी त्यांना जामीन नाकारणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी त्यांची जामिनावर सुटका केली. महाजन यांच्या या कृतीची उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने गंभीर दखल घेत त्यांना निलंबित केले, असे सूत्रांतर्फे सांगण्यात आले.
महाजन यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. निलंबनाच्या कार्यकाळात त्यांनी अंबाजोगाई परिसर सोडून कुठेही जाऊ नये आणि जायचे असल्यास प्रधान सत्र न्यायाधीशांची परवानगी घ्यावी. या काळात खासगी नोकरी वा वकिली केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
स्त्री भ्रूणहत्याप्रकरणी जामीन देणारे न्यायाधीश निलंबित
स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. सरस्वती व सुदाम मुंडे या दाम्पत्याला परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता जामीन नाकारण्याऐवजी त्यांची जामिनावर सुटका करणारे अंबाजोगाई (बीड) येथील जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. महाजन यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने निलंबित केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-01-2013 at 04:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One judge gets suspend for giving bell on bornchild murdered case