अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच मुख्य प्रवाहातील माध्यमे मूळ विषयाला बगल देताना दिसतात. त्यामुळे पर्यायी माध्यमांना आणि व्यासपीठांना आपण नागरीक म्हणून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी येथे केले.
‘युनिक फिचर्स’तर्फे मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ई-मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. नेमाडे यांच्या हस्ते झाले. युनिक फिचर्सच्या http://www.uniquefeatures.in  या संकेतस्थळावर हे संमेलन भरविण्यात आले आहे. पहिल्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, युनिक फिचर्सचे संपादक-संचालक सुहास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी या वेळी उपस्थित होते. मुख्य प्रवाहातील माध्यमे आपल्यापर्यंत वास्तवाचे चित्र उभे करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या परिस्थितीवर विश्वास ठेवणे बरोबर नाही, असेही डॉ. नेमाडे म्हणाल़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optional media should be promoted dr nemade