मुंबई पोलिसांच्या हत्यारे विभागात कार्यरत असलेल्या मधुकर राणे (२५) या पोलीस शिपायावर दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका सहकारी पोलीस हवालदाराच्या मुलीचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मधुकर राणे हा दादरच्या पोलीस वसाहतीमध्ये राहतो. त्याचे त्याच भागात राहणाऱ्या एका सहकारी हवालदाराच्या २३ वर्षीय मुलीशी प्रेमसंबध होते. राणे याचे वडील सुद्धा पोलीस खात्यात आहेत.
२३ डिसेंबरला आपण इमारतीच्या पायऱ्या चढत असताना मधुकरने माझा विनयभंग केल्याची तक्रार पिडीत मुलीने मंगळवारी दादर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी राणे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला उशीरापर्यत अटक झालेली नव्हती. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी राणे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दादर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer missbehave with other policer officers girl