शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी सर्वदूर पोहोचताच महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाळासाहेबांची प्रकृती सुधारावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी यज्ञ, प्रार्थना, आरती सुरू झाल्या. डोंबिवलीत शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी यज्ञ आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला. कुल्र्यात नेहरूनगर येथेही महामृत्युंजय जप करण्यात आला.सोलापुरात रूपाभवानी मंदिरात देवीची महाआरती करत बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. धुळय़ातही देवी मंदिरात महाआरती झाली.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pray for thackeray health