सत्तरच्या दशकातील अभिनेता आणि राज कपूर यांचे पुत्र रणधीर कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली अतिदक्षता विभागात रणधीर कपूर यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती बरी आहे, असे त्यांची कन्या व आघाडीची अभिनेत्री करिना कपूर यांनी म्हटले आहे.
डब्बू या टोपणनावाने चित्रपटसृष्टीत ओळखले जाणारे अभिनेता रणधीर कपूर ६५ वर्षांचे असून १९७१ साली आर के बॅनरच्या ‘कल आज और कल’ या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ‘जवानी दिवानी’ हा १९७२ साली झळकलेला त्यांचा चित्रपट प्रचंड गाजला. त्याचबरोबर ‘हीना’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही चांगला प्रेक्षकप्रिय ठरला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-12-2012 at 02:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Randhir kapoor admitted to hospital