गोवंडी येथील पालिकेच्या शाळेत आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यामुळे आधारकार्डाचे काम सुरू असलेल्या पालिका शाळांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
विविध ठिकाणच्या पालिका शाळांमध्ये सध्या आधारकार्ड देण्याचे काम सुरू आहे. गोवंडी येथील पालिका शाळेमध्ये गेल्या आठवडय़ापासून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे.
शाळेत आलेल्या एशाच एका अज्ञात इसमाने शाळेतील मुलींच्या शौचालयात जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यामुळे पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. आधारकार्डाचे काम करणाऱ्या संस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वीही या शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. त्यामुळे मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून पालिका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग
गोवंडी येथील पालिकेच्या शाळेत आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यामुळे आधारकार्डाचे काम सुरू असलेल्या पालिका शाळांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणच्या पालिका शाळांमध्ये सध्या आधारकार्ड देण्याचे काम सुरू आहे. गोवंडी येथील पालिका शाळेमध्ये गेल्या आठवडय़ापासून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे.
First published on: 22-01-2013 at 03:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape by who came for getting the aadhar card in school